अमळनेर तालुक्यात पेट्रोल डिझेल टंचाईबाबत अफवा; प्रशासनाचे स्पष्टीकरण
अमळनेर (प्रतिनिधी) –
सध्या अमळनेर तालुक्यात काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, काही नागरिकांकडून गाड्यांमध्ये फुल टँक पेट्रोल-डिझेल भरण्यासोबतच ड्रम व बाटल्यांमध्येही इंधन साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिणामी, काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर तात्पुरत्या स्वरूपात इंधन संपल्याची स्थिती निर्माण होत आहे.
दरम्यान, या संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे स्पष्ट केले की, जळगाव जिल्ह्यासह अमळनेर शहरात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध आहे. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अनावश्यक साठेबाजी टाळावी. आवश्यक तेवढेच इंधन भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
*👉 अमळनेर शहरात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध आहे,नागरिकांनी संयम बाळगून अफवांना बळी न पडता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तहसीलदार-रुपेश कुमार सुराणा*
![]()

