
अमळनेर

तालुक्यात सर्वाधिक रुग्णांना सदैव रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा ट्रॉफी देऊन प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेळोवेळी अमळनेर युवा मित्र परिवार ग्रुप तर्फे फक्त एका मॅसेज वर अनेक युवक गंभीर रुग्णांना तातडीने रक्त देण्यासाठी तयार असतात.अमळनेर शहरात सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांच्या मार्फत रक्तदान चळवळ चालवण्यात येते. गंभीर रुग्णांना युवक एकत्र आल्याने आता प्रत्येक रक्तगटाचे रक्त कोणत्याही क्षणी उपलब्ध होत असते त्यामुळे रुग्णाचा पैसा आणि वेळ तसेच जीवही वाचतो काही युवकांनी यासाठी वेळोवेळी रक्तदान केले आहे. मनोज शिंगाणे यांचे रक्तदान चळवळ ही फक्त अमळनेर तालुक्यापूर्ती मर्यादित नसून ती कोणताही जिल्हा असो ते रुग्णांना रक्त लागल्यावर मनोज शिंगाणे यांना संपर्क करतात.त्यांची रक्तदान चळवळ संपूर्ण खानदेशात चालू आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत,डॉ सुनील शिंगाणे आणि सुहास ग्रुप बसस्टँड यांनी या महान रक्तदात्यांचा सत्कार सोहळा पाठक प्लाझा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते रक्तदात्याचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते, संचालक प्रवीण जैन , संचालिका वसुंधरा लांडगे, संचालक व आरोग्यदूत प्रवीण पाटील, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंतलाल वानखेडे, चेतन राजपूत,ईश्वर महाजन,उमेश धनराळे,राहुल बहिरम प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.सूत्रसंचालन रणजित शिंदे तर आभार संजय पाटील यांनी मानले.
