
अमळनेर

अमळनेर तालुक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाडळसरे धरण आहे या धरणासाठी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील व मंत्री अनिलदादा पाटील यांच्यासोबत धरणाचे काम पुर्ण करण्यासाठी एकत्र लढा देणार असे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी सांगितले..
मंत्री अनिल दादा पाटील यांनी पाच वर्षात अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील नेहमीच विकासाकडे मार्गक्रमण करतात जो निधी देईल त्यांना त्यांची साथ असते.. याप्रमाणे त्यांनी नुकतीच मंत्री अनिल दादा पाटील यांच्या घरी भेट घेऊन पाडळसरे धरणासाठी आपण एकत्र लढा देणार असे सुतोवाच केले.. यावेळी लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील सह मा. नगरसेवक व अनिलदादा मित्र परिवारातील व माजी कृषीभूषण साहेबराव परिवार मित्रपरिवार उपस्थित होते.
आता तालुक्यात सूत्रधार आणि कर्णधार एकत्र आले असून पाडळसरे धरणासाठी एकत्र लढा देतील अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे त्यामुळे तालुक्याला नक्की फायदा होईल.