
महविकास आघाडी कडून डॉ.अनिल शिंदेचे नाव निश्चित
तुल्यबळ उमेदवार दिल्याने अमळनेरात तिरंगी लढतीचे संकेत
अंमळनेर
-अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून खल सुरू असताना काँग्रेसचे डॉ.अनिल शिंदेचे नाव निश्चित केल्याची आज मुंबई येथून मिळाली असून उद्या रोजी त्यांना पक्षातर्फे ए बी फॉर्म दिला जाणार आहे.राष्ट्रवादीने तुल्य बळ उमेदवार दिल्याने अमळनेरात होणार तिरंगी लढतीचे संकेत मिळाले आहेत.
खरे पाहता डॉ.अनिल शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीसाठी शड्डू ठोकून जोरदार तयारी सुरू केली होती,साम दाम दंड भेद हे निवडनुकीसाठी लागणारे सर्व अस्त्र वापरण्याची तयारी ते दाखवीत होते,गणोशोत्सवात मंडळांसाठी योगदान असेल,तालुक्यातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मदत करणे असेल किंवा जनतेचे वाढदिवस, द्वारदर्शन,विवाह सोहळे,पीक पाहणी अश्या विविध माध्यमातून सतत ते जनसंपर्कात राहिले होते.विरोधी पक्षातील इतर इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत सर्वच बाबतीत ते सक्षम दिसून आले होते, यामुळे काँगेसच्या उमेदवारी वर त्यांनी जोरदार दावा करीत उमेदवारी मागितली होती ही जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्याने डॉ शिंदे हे उमेदवारी साठी प्रयत्नशील होते.
अखेर पक्षाने त्यांची सुरू असलेली जोरदार तयारी आणि मागील काळात काँग्रेसकडून सक्षमपणे लढवीलेली विधानसभा निवडणुकीत पाहता डॉ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती डॉ अनिल शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी च्या काही पदाधिकारीनि देखील दिली आहे उद्या त्यांना एबी फॉर्म मिळाल्यावर 29 रोजी ते आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.
सदर उमेदवारी नंतर अमळनेर येथे महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील,अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी आणि महाविकास आघाडी तर्फे डॉ अनिल शिंदे अशी तिरंगी लढत होणार आहे