
*शेतकऱ्याचा अधिकाऱ्यांसमोर जीव देण्याचा इशारा**
अमळनेर
केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पी एम किसान योजना सुरू केली आहे. मात्र याबाबत अमळनेर तालुक्यात अनेक शेतकरी या योजने पासून वंचित आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याची घोषणा केली. परंतु के वाय सी पूर्ण होऊन सुद्धा अनेक शेतकऱ्यांनाच्या खात्यावर पैसे आले येतच नाही. याबाबत गुरुवार रोजी दुपारी सात ते आठ शेतकऱ्यांनी अमळनेर कृषी कार्यालयाल गाठून तालुका कृषी अधिकारी यांना घेरावा घातला असून चांगलेच धारेवर धरले. जाब विचाराल आहे.अमळनेर कृषी कार्यालयात एका शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप केला आहे. की गेल्या वर्षभरापासून तब्बल १८ चकरा मारून देखील मला पी एम किसान योजनेचा लाभ का मिळाला नाही. आपल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कागदपत्रे पूर्णपणे जमा केले असून अजूनही मी त्या लाभापासुन वंचित का? याचे उत्तर मला द्यावे. शेतकरी वर्गातील कष्टकरी गरीब शेतकऱ्याचा जीवाचा तळतडा घेऊ नका साहेब दिवस रात्र कष्ट करत रक्ताचे पाणी करत मूठभर शेती घेतली आहे. त्यात देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. तर आपण आम्हाला सांगा अजुन कोणत्या अधिकाऱ्याकडे जाऊ, तर आपल्या या कार्यालयातून तुमच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला उडवा उडवी चे उत्तर भेटतात पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. शेतीची कामे सोडून या ठिकाणी येऊन खेटत असतो. तीव्र संताप व्यक्त केला जात असून थेट याच ठिकाणी कृषी कार्यालयातच आत्महत्या करेल असा इशारा शेतकरी – नारायण दिगंबर पाटील अमळनेर यांनी दिला
*शासकीय कार्याकडून योग्य मार्गदर्शन नाही शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर*शेतकरी बँकेत जाऊन विचारतात बँक वाले सांगतात तलाठीला भेटा, तलाठी सांगतात कृषी सहायकाकडे जा ते आणि कृषी सहाय्यक सांगतात आमच्या हातात काहीच नाही. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही. शेतकरी लागवड व पेरणी कामाच्या दिवसात शासकीय कार्यालयात हेलपाटे मारून थकत आहे.
कागदोपत्रांची पूर्तता करूनही लाभ नाही प्रशासन शेतकऱ्याची थट्टा करीत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्र सरकार कडून पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयांचा लाभ मिळतो ज्या शेतकऱ्याच्या नावावर सात बारा आहे अश्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळतो आहे. परंतु सातबारा नावावर असून सुद्धा अनेक शेतकरी या लाभा पासुन वंचित आहेत. याबाबत शेतकऱ्यांकडून नाराजीचा सुर व्यक्त केला जात आहे._
________________________
डिऍक्टिव्ह प्रकरण आपण ॲक्टिव्ह करण्यासाठी पाठवलेले आहेत राज्यस्तरावरून ऍक्टिव्ह होतात जिल्ह्या वरून पुण्याला पाठवलेले आहेत सदर प्रकरणे वर्षभरापासून पाठवलेली १४०० शे शेतकऱ्यांचे प्रकरणे पाठवलेले आहेत काही शेतकऱ्यांचे प्रकरणे झाले आहेत. चंद्रकांत ठाकरे- तालुका कृषी अधिकारी